‘सायारा’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी घोडदौड: 500 कोटींहून अधिक कमाई, ‘वॉर’ आणि ‘डंकी’लाही मागे टाकले
तीन आठवड्यांत 500 कोटींचा टप्पा पार मोहित सूरी दिग्दर्शित ‘सायारा’ या रोमँटिक म्युझिकल चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले असून, केवळ १८ दिवसांत जगभरात तब्बल ₹507 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सने आपल्या इंस्टाग्रामवर ही माहिती शेअर करत लिहिले, “#सायारा तुमच्या हृदयात घर करत गेली – यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत.” तरुण प्रेक्षकांनी दिला भरघोस प्रतिसाद यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “आजच्या तरुण प्रेक्षकांनी ‘सायारा’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. थिएटरकडे त्यांचा ओढा कमी होत आहे, हे म्हणणे या चित्रपटाने चुकीचे ठरवले. सर्व प्रेक्षकां
Read More