Pune Ring Road| अखेर पुणे रिंगरोडचे काम रखडले; कारण जाणून व्हाल थक्क

pune ring road

पिंपरी चिंचवडचा झपाट्याने विकास होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे.

रस्ते महामंडळाकडे भूसंपादनाची भरपाई म्हणून आणखी हजार कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

Pune Ring Road Map Download

या प्रकल्पासाठी ७०३ हेक्टरपैकी आठ हजार शेतकऱ्यांनी त्यांची एकूण ४६७ हेक्टर जमीन प्रशासनाला देण्याचे मान्य केले आहे.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड रिंगरोडचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन मार्ग निश्‍चित केले आहेत. तर पूर्व भागात मावळातील १९ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे.

तसेच पश्‍चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे.

हा रस्ता मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्‍यांमधून प्रस्तावित करण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी या तालुक्यांचे प्रांताधिकारी नेमण्यात आले आहेत. राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

हा रिंगरोड १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीचा सोनार आहे. तसेच या रिंगरोड साठी २३०० हेक्‍टर जागेची गरज आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित केला आहे.

Pune Ring Road Map Download

आतापर्यंत पुणे रिंग रोडसाठी १५० एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पाला आठ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत.

त्यानुसार शेतकऱ्यांच्या संमतीने 467 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त २५ टक्के भरपाई दिली जात आहे.

तसेच भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटींचा निधी प्राप्त झाल्याने भूसंपादनाला वेग आला आहे.

या निधीचे वाटप पूर्ण झाले असल्याने आणखी एक हजार कोटी रुपयांचा निधी रस्ते महामंडळाला प्रस्तावित करण्यात येणार आहे.

Pune Ring Road Map Download

जमीन देण्याऱ्या शेतकऱ्यांना संमतिपत्र देण्यासाठी २१५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केलं आहे कि, या कालावधीत शेतकऱ्यांनी संमतिपत्रे द्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *