मुंबईमध्ये म्हाडाची हायफाय घर तेही एकदम स्वतःत; किंमत जाणून घ्या आणि नावनोंदणी करा..

mhada lottery mumbai

Mhada Lottery Mumbai: मुंबई म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमधून हाय-फाय सुविधेसह म्हाडा लक्झरी फ्लॅट मिळू शकतात. मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडा लॉटरी  (Mhada Lottery) काढणार आहे.

त्यामुळे आता मुंबईत म्हाडाचे आलिशान घर घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा गृहनिर्माण प्रकल्प स्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असून त्यात हायफाय सुविधा असणार आहे.

त्यात प्रत्यक्षात कोणती वैशिष्ट्ये असतील? आणि ही लॉटरी कधी निघणार?  या बद्दल जाणून घेण्यासाठी माहिती सविस्तर वाचा.

Mhada Lottery Mumbai

या घरात म्हाडातर्फे मिळणार या सुख सुविधा :

म्हाडा नेहमीच सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधते. आतापर्यंत म्हाडाकडून मोकळी मैदाने, उद्याने अशा सुविधा पुरविल्या जात होत्या.

पण आता म्हाडा प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस आणि पोडियम पार्किंगसारख्या हायफाय सुविधा असलेली घरे बांधत आहे.

गोरेगाव येथील प्रेमनगर येथील म्हाडाच्या पहिल्या ‘हायफाय’ प्रकल्पातील 332 घरांचाही या सोडतीत समावेश करण्याचा म्हाडा प्रयत्न करणार आहे.

Mhada Lottery Mumbai

या तारखेला निघणार म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery)

गोरेगाव येथील प्रेमनगर येथे 39 मजली टॉवरचे बांधकाम सध्या जोरात सुरू असून आतापर्यंत 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे.

बांधकाम वेगाने सुरू असल्याने दिवाळीपर्यंत मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोक या HiFi घरांसाठी अर्ज करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *