पुणे-मुंबई शहरात स्वतःचा फ्लॅट घ्यायचं स्वप्न पाहताय तर, म्हाडाने सुरु केली ही नवी स्कीम, पाहा किंमत

buy flats in pune mumbai

मुंबई असो की पुणे, सर्वत्र घरांची मागणी वाढली आहे. म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘म्हाडा’ला जागेची कमतरता भासत आहे, त्यामुळे परवडणारी घरे (परवडणारे फ्लॅट मुंबई) देण्यात अडचणी येत आहेत.

Buy Flats In Pune – Mumbai

दरम्यान, राज्यातील इतर म्हाडाच्या मंडळांमध्येही म्हाडाच्या घरांची मागणी सुरू झाली आहे.

दरम्यान, म्हाडाच्या घरांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता लवकरच महामार्गाच्या कडेला सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘म्हाडा’ची परवडणारी घरे तयार होणार आहेत.

त्यामुळे नागरिकांना चांगली कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळू शकते.

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी म्हाडाने एमएसआरडीसीला 1000 कोटी रुपये दिले आहेत.

असे असतानाही सध्या म्हाडाकडे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

Buy Flats In Pune – Mumbai

त्यामुळे पैशाच्या मोबदल्यात म्हाडाकडून ‘समृद्धी’ महामार्गालगतचे भूखंड खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

म्हाडाने आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना मार्चअखेर भूखंड शोधण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे आगामी काळात महामार्गालगत म्हाडाची घरे खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडाने आता जमिनीचा शोध सुरू केला असून नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गालगत जमिनीचा शोध सुरू आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आणि नियोजनबद्ध शहर उभारणे हा म्हाडाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

समृद्धी महामार्गालगत जागा उपलब्ध झाल्यास तेथे गरजेनुसार परवडणारी घरे बांधली जातील आणि शहराचाही विकास होईल, अशी माहिती ‘म्हाडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *